नमस्कार! उद्या येणाऱ्या
गुढीपाडव्याला आमच्या चित्रपंचांग या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण होईल. सरत्या वर्षात आम्ही
एकूण आठ भाग प्रदर्शित केले- गुढीपाडवा, अक्षय तृतीया, गुरुपौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्री,
दसरा, दिवाळी आणि
उत्तरायण. सर्वच लेखांना
तुम्ही मनापासून दाद दिली. मुख्य म्हणजे
निरनिराळ्या वयोगटातील लोकांपर्यंत आमचे लेख पोचले आणि त्यांनी त्यांच्या
प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवल्या. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
ह्या ब्लॉगची सुरुवात
करताना वास्तुकलेतील 'Renaissance’
ही
संकल्पना आमच्या मनात होती.
युरोपमध्ये
१४ व्या शतकात Renaissance या चळवळीची
सुरुवात झाली. Renaissance म्हणजे पुरातन
अभिजात संस्कृतीचे नव्या रुपात पुनरुज्जीवन करणे. १४व्या शतकाच्या
आधीचा काही काळ dark ages म्हणून ओळखला
जातो. १४व्या
शतकात इटलीतील बुद्धीमंत व कलाकारांनी
सर्वात पुरातन अशा ग्रीक व रोमन काळातील अभिजात कलेचे पुनरुज्जीवन केले. यानंतर संपूर्ण युरोपात
ही चळवळ पसरली. साहित्य, वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला अशा सर्व
माध्यमांना नवीन एक नवीन वाट मिळाली आणि या सर्व कलांची भरभराट झाली... नव्या रुपात अभिजात कला
जगासमोर आली आणि बहरली. जेव्हा आम्ही या
चळवळीबद्दल वाचले तेव्हा आम्हाला असे वाटले की आपल्याकडे आपण Cultural Renaissance का करू नये? जागतिकीकरण, विकास, आधुनिकता हे सर्व कितीही
आवश्यक असले तरी त्याचसोबत आपण आपली अभिजात तत्वे आणि संस्कृती पण जोपासायालाच हवी! आज आमच्या पिढीमध्ये
भारतीय संस्कृतीची माहिती व अभिमान या दोन्हींचा
अभाव आढळतो. खरेतर संस्कृती
किंवा परंपरा म्हणजे ओझे नसून आपल्याला चैतन्य देणाऱ्या गोष्टी आहेत. जर लोकांना याचा विसर
पडत असेल तर त्यांना नव्या रुपात लोकांपर्यंत पोचवायलाच हवे. त्यामुळे आपली संस्कृती, परंपरा जास्तीत जास्त
लोकांपर्यंत पोचवणे हा चित्रपंचांगचा उद्देश आहे.
लेखनाची पूर्व तयारी
म्हणून वाचन करताना आम्हाला अनेक नवीन गोष्टी समजल्या. आपल्या संस्कृतीचे व तत्त्वज्ञानाचे नवे पैलू गवसले. आम्हाला जेवढ्या नव्या
गोष्टी समजल्या तेवढा आपल्या संस्कृतीबद्दलचा आमचा आदर आणखीनच वाढला. तसेच तुमचे प्रोत्साहन
असल्यामुळे प्रत्येक लेख लिहिताना
अधिकाधिक उत्साह वाटला.
मागच्या
गुढीपाडव्याच्या लेखात आम्ही म्हणालो होतो की, हा दिवस म्हणजे नवनिर्मिती! रोजच्या जगण्याला समांतर असा नवनिर्मितीचा प्रवास आपण चालू
ठेवायला हवा..तसाच
चित्रपंचांग ब्लॉगचा प्रवास देखील पुढे सुरूच राहील. केवळ सणांवरच न लिहिता त्याचबरोबर आपली संस्कृती, वाङ्मय व परंपरा
यावरदेखील लिहिण्याचा आमचा मानस आहे. भारतीय संस्कृतीसाठी आमच्या परीने केलेला cultural renaissance चा लहानसा प्रयत्न! येत्या रामनवमीच्या
दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीला आमचा नवीन लेख प्रसिद्ध होईल. तेव्हा तुमचा प्रतिसाद, पाठींबा आणि प्रतिक्रिया
आम्हाला कायम मिळूदेत अशी आम्ही अशा करतो. आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक
शुभेच्छा!
सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९
Gudhi padwa ani nutan varshasah tumchya blog la ek varsha poorna zalya baddal khup khup shubhechchha ani tumchya ya navin upakramasathi all the very best....asach lihit raha ani amhala nav-navin goshti sangat raha...
ReplyDeleteThank you very very much Apoorva tai!😊😇 Encouragement from loyal reader gives us energy!
DeleteIt's a festive treat to read your blogs on tradition and logic behind it... it's informative as well as entertaining. We could see the in depth knowledge and research behind it. keep it up.
Delete