Monday, 27 March 2017

GUDHI PADWA

              A glance at the surroundings today will only make us marvel at the ‘festivities of creation’ that Mother Nature has begun celebrating! Spring is at our doorsteps. The cyclic pattern on seasons is over, and it is time for a new beginning, starting today. What could be a more fitting start to the New Year, than to witness trees in full bloom and wake up to Sunrise after new moon? Indian folk tried to imbibe this very ‘spirit of creation’ and hence today is celebrated as the first day of the Hindu Calendar Month of Chaitra i.e. Gudhi Padwa.
                  Following the vast changes India underwent as a nation over centuries, this day has several other attributes and reasons to be celebrated as the New Year Day! Chaitra Shu. Pratipada, as it is referred to, finds mention in vintage scriptures of our land. According to the ‘Brahmapurana’ it was this day that Lord Brahma created the universe, and the ‘Satyayuga’ began. Likewise, it is also believed that Vishnu, salvaged the earth off ‘Pralaya’ or the great catastrophe, by reincarnating as a fish, his first among the ten ‘Avataras’. According to the Ramayana, it  was today, that Lord Rama returned back to his kingdom of Ayodhya after a victorious battle against the dark forces of Ravana; and people welcomed him by erecting ‘Gudhis’ or staffs atop their houses.
Maharashtra, owes the ‘Shalivahan’ kings a great debt for many of its cultural embellishments. It is believed that the Shalivahan Kings celebrated their victory over enemy forces by starting ‘Shalivahan Shak Sanvatsara’ or their own calendar on this day around 78AD, which till date finds mention in Lunar Calendars across Maharashtra as ‘Shalivahan Shakey’. To cut a long story short, Indians have always believed in ‘creation of new’ as the deed closest to divinity. And it is in celebrating the beckoning of this spirit, that Gudhi Padwa attains its special status as one of the most auspicious time frames of the year. India has always been an agrarian country. By spring time, the Ragbi crops are harvested and it is time to prepare fields for the new season come monsoon. Hence, Gudhi Padwa also finds a special place in the majority agrarian population of the country
The festivities for today largely involve a practice of erecting a long bamboo staff or ‘Gudhi’ outside one’s home. This staff or ‘Gudhi’ is in fact a manifestation of a victory flag hoisted after the Shalivahan Kings emerged victorious over their enemies. It was because Shalivahan dynasty that dominated the landscape of the then Maharashtra, that the tradition of hoisting colourful Gudhis became so popular all over the state! Another folklore suggests that Gudhi is in fact a thanksgiving to Lord Brahma for creating this universe and is also referred to as ‘Brahmadhwaja’ or ‘Brahma’s Flag’ i                                  

The structure of the Gudhi is quite simple – a long Bamboo staff, adorned with a green or bright coloured silk, decorated with the new leaves of Mango & Neem, a garland of colourful flowers ornamented with sugar candy. This decorated staff  is then hoisted outside one’s home to celebrate the beginning of the New Year! The fresh green colours of leaves atop the bamboo staff could be Man’s version of replicating the splendour of spring in his own timid way. Nature is the epitome of design, and it is in alignment with natural orders that the process of creation becomes seamless. The ‘Prasada’ or offering for the day is neem leaves and sugar candy – a combination of sweet and bitter tastes, which is to symbolise that every new year comes with its share of happiness and sorrows and that we should be able to take both in the same stride and march ahead.

Indian festivals are a perfect conglomeration of morals, values all aesthetically blended so well! Gudhi Padwa, being the first for the year, stands as an emblem of ‘Spirit of Creation’
Spring, which begins today, is in itself a symbol of radiance, opulence and happiness, virtues of a perfectly blended ‘Creation’! The idea behind replicating Mother Nature’s glory is not just to recreate the splendour in our own timid way, but to in fact imbibe the true values behind the process.  The idea behind writing this blog is to convey a thought, “Let us try and step out of our burgeoning lives to also imbibe in ourselves a ‘sense of creation’, which is also a source of happiness and radiance”     
Here’s wishing all our readers happiness and prosperity along with immense spirit of creativity on this auspicious day of ‘Gudhi Padwa’!

Saleel Savarkar - +91-9823900318

Anuja Jogdeo  +91-8975767599

गुढी पाडवा


          आत्ता जर आपण आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे दृष्टीक्षेप टाकला, तर नवनिर्मितीचा अनोखा सोहळा पाहायला मिळेल. निसर्गाचे एक ऋतुचक्र संपून पुन्हा नवे सुरु झाले आहे! ऋतुराज वसंताची लागलेली चाहूल, झाडांना फुटलेली नवी पालवी, अमावास्येनंतर पुन्हा नव्याने उगवणारा चंद्र आणि याच सुमारास सूर्याचा प्रथम राशीत म्हणजेच मेष राशीत होणारा प्रवेश... नव्या वर्षाची सुरुवात करायला याहून अनुकूल परिस्थिती कोणती असू शकेल? निसर्गातील अशा या नवनिर्मितीचे चैतन्य माणसाने आपल्या संस्कृतीमध्ये आणले आणि मग त्या चैत्र शुक्ल प्रतिपदेला नाव मिळाले, "गुढी पाडवा”!
                   निसर्गाच्या प्रभावाबरोबरच गुढी पाडव्याच्या दिवसाला इतरही चित्तवेधक पैलू आहेत. आपल्या प्राचीन वाड्ग्मयात देखील या दिवसाचा उल्लेख आढळतो. ब्रह्म पुराणानुसार या दिवशी ब्रह्म देवाने सृष्टीची निर्मिती केली आणि सत्ययुगाची सुरुवात झाली. तसेच याच दिवशी भगवान विष्णू यांनी त्यांचा प्रथमावतार म्हणजेच मत्स्यावतार धारण केला आणि पृथ्वीला प्रलयापासून वाचवून नवजीवन दिले. रामायणातील संदर्भानुसार, श्रीरामांनी रावणवध करून आणि आपला वनवास संपवून याच दिवशी अयोध्यानगरीमध्ये प्रवेश केला व रामराज्याची सुरुवात झालीतसेच शालिवाहन राजाने त्याच्या शत्रूंवर विजय मिळवून या दिवसापासून "शालिवाहन  शक संवत्सराची" सुरुवात केलीया सर्व कारणांमुळे गुढी पाडव्याच्या दिवसाला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच हा दिवस आपण साडेतीन मुहुर्तांपेकी एक मुहूर्त मानतो. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर याच काळात रबीचा हंगाम संपतो व नवा हंगाम चालू होतो. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्याजोगी आहे. एकूणच या निरनिराळ्या बाजूंनी पहिले असता हा काळ नूतन वर्षाची व नव्या गोष्टींची सुरुवात करण्यास अगदी योग्यच आहे!
                                 आजच्या दिवसाची मुख्य परंपरा म्हणजे प्रत्येक घराबाहेर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी उभारली जाणारी गुढी! ही प्रथा का सुरु झाली यामागे दोन मतप्रवाह आढळतात. एक म्हणजे, गुढ्या उभारून अयोध्येतील लोकांनी श्रीरामांचे आगमन साजरे केले. परंतु भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यावर हे मत फारसे पटत नाही. कारण गुढीची पद्धत ही मुख्यतः महाराष्ट्रीय किंवा मराठी लोकामध्ये आढळते. दुसरा मतप्रवाह जो  महाराष्ट्रातील गुढीच्या प्रथेचे समर्थन करतो, तो म्हणजे शालिवाहन राजाने आपल्या शत्रूंवर मिळवलेला विजय! 'प्रतिष्ठान' म्हणजे सध्याचे 'पैठण' येथून राज्यकारभार करणाऱ्या शालिवाहन राजाने या दिवशी आपल्या शत्रूंचा विनाश केला आणि त्या विजयी दिवसाची आठवण म्हणून त्याच्या प्रजेने गुढी उभारण्यास सुरुवात केली. कारण कोणतेही असले तरी शतकानुशतके प्रत्येक मराठी घरात ही गुढी उभारली जाते. थोडक्यात काय, तर आपल्यासाठी गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आणि नव्या गोष्टींची सुरुवात! विजयाच्या प्रतिकासोबतच ही गुढी म्हणजे जणू आपल्या संस्कृतीचा ध्वजच आहे. काहींच्या मते ही गुढी उभारणे म्हणजे ब्रह्मदेवाचे स्मरण करणे, त्यामुळे याला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हटले जाते. उंच काठीवरचे हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे जरीचे वस्त्र, त्यावर आंब्याची व कडूनिंबाची डहाळी, फुलांचा हार व साखरेची गाठी आणि सर्वात वर मंगल कलश! रंगीत फुलांनी आणि कोवळ्या पालवीने बहरलेली झाडाची फांदी जशी आकर्षक दिसते, तसाच भास या गुढी मध्ये होतो. नव्या वर्षाचा दिवस ठरवण्यापासून ते त्या दिवासापासून नवी प्रथा सुरु करण्यापर्यंत निसर्गाने त्याचा प्रभाव पाडलेला आहे हे यातून जाणवतेतसेच या दिवशी आपण प्रसाद म्हणून साखरेच्या गाठी खातो व त्याचबरोबर कडूनिंबाची पाने देखील खातो, म्हणजेच सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे हा सण आपल्याला सांगतो!
                  आपले सण म्हणजे निरनिराळ्या गोष्टींची, मुल्यांची प्रतिके आहेत असे मानले तर त्यात गुढी पाडवा म्हणजे "नवनिर्मिती"!  कारण या काळात सुरु होणारा वसंत ऋतू म्हणजे चैतन्य, उत्साह, आनंद आणि अर्थातच नवनिर्मिती! आपण सर्व निसर्गाकडून नवनिर्मितीची ऊर्जा घेऊ. नव्या कामांची सुरुवात उत्साहाने करून वसंताच्या पालवीप्रमाणे नवे आचार-विचार अंगीकारु. रोजच्या एकसुरी जगण्याला समांतर असा नवनिर्मितीचाही प्रवास चालू ठेऊ. आमच्या सर्व वाचकांना गुढी पाडव्याबरोबरच नवनिर्मितीसाठीसुद्धा हार्दिक शुभेच्छातुमचे नवे वर्ष वसंत ऋतूप्रमाणे आनंददायी आणि उत्साह्वर्धक ठरो हीच सदिच्छा!
                          या लेखाचा शेवट करताना 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटातील ' तू बुद्धी दे' या गाण्याच्या ओळी मनात येत आहेत. तशीच प्रार्थना आपण निसर्गाकडे करू आणि ती प्रत्यक्षातदेखील आणू...
'तू बुद्धी दे, तू तेज दे; नवचेतना, विश्वास दे; जे सत्यसुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे!’

सलील सावरकर९८२३९००३१८

अनुजा जोगदेव-   ८९७५७६७५९९

Monday, 20 March 2017

Chitra Panchang : a new beginning beckons!

Festivals have been an integral part of our growing years. Our festivities, just like our mother’s teachings have played a pivotal role in our upbringing. While we have grown up learning the basics of ‘how’ and whys’ of our life, we are sure, many amongst us have stumbled upon a critical phase in our life – unanswered questions about our culture, our festivities. As a result some of us decided to let go of these stagnant social practices, because we feel too backward to be a part of them; while some blindly turn to follow them all throughout.
While we were and are still surrounded by a mixed group of similar thinking individuals, we could not but ask ourselves “Are we failing the very objective of our festivities by choosing the either extremes?” With this fear, we took to studying and reading certain aspects of our culture to unravel its mysteries.
Element of design and aesthetics were the founding principles of our graduation life, because we have been students of architecture. And there we found our map to explore this mystique culture! Indian culture - often mistaken to be ‘a’ religion, is in fact a testimony to aesthetic sensitivity of our ancestors. We were in search of an effective tool to communicate our thoughts and experiences as we took to explore our beautiful culture. Now you know why we are here, and what we shall be writing about! Titled ‘Chitra Panchang’ this blog will be an account of our journey as it shall take place. While doing so, we wish to strike a chord which is slightly central to the bitter logic of the atheism and the blind beliefs of believers. We hope readers take this into account before any judgments shall be made.

Indian Culture, is incomplete without its festivities, its colorful festivals. These social occasions are something every family longs for; to meet and greet members of the family and to celebrate in whatever small or big way is possible; the reason being simple ‘Have a good time!’ And why not? Festivals are a fresh departure from our mundane ‘lives full of care’- to put it Wordsworth’s words.
There is a belief, that every festival shares some thought of wisdom, percolated from one generation to the other. However, there also seems to be a timid attempt by man, to replicate the happenings in nature, as seasons unfold. We would wonder, ‘Why?’ Man is an extremely insecure and greedy animal. Whatever he sees, he wishes to acquire or replicate to suit his interests. Could this also be one of those tertiary requirements, which man wished to fulfill?

The Indian subcontinent is blessed with patterns in its seasons. The beautiful themes are vastly different from each other right through spring up to winter. Man, who was a silent observer and admirer to these happenings in his surrounds, was eager to recreate the same to make his life more interesting! This is what might have led to the origin of our festivals. One often wonders if this could be the reason, we have festivals strategically places at the dawn of every new season. But Man did not stop at this. He complemented this replication with a beautiful thought, which was a result of his profound thinking! Perhaps this is why, centuries old festivities still garner the same significance, although the very way of celebrating them has changed.

However, as time progressed, perhaps the subtle idea of festivities stagnated, and fortified themselves as ‘customs’. Naturally, this was a diversion to the course of free flowing new thoughts, which was and in cases still is the essence of our culture.
At times, it worries us whether we are losing interest in all these ideas, and following them as mandatory jobs?
         
          We are just two out of many young, spirited, free thinking inheritors of this culture, who wish to take a fresh look at what is a highly misconstrued, mystified culture. Our aim is to put in a new perspective at the way we can in future look forward to each and every festival of ours. With the rapidly advancing time constraints, it is imperative, that we all adapt to what is ‘modern’ and yet be able to retain our own individuality in this process. It is in this realization and practice only, that we can call ourselves true torch bearers of this great legacy that lies before us.  

Come this 28th March, on the auspicious day of Gudhi Padva, on the first day of ‘Chaitra’ we shall be uploading our first blog. It will be our intent, to publish one story, one experience of this mystique journey per month of our calendar year. However we would wish to clarify modestly, that we do not believe, that we are fully correct in our writings. This is just a perspective, and readers are most welcome to agree, differ or even write back to us! We look forward to this interaction.


-         Saleel Savarkar +91-9823900318
Anuja Jogdeo +91-8975767599


चित्र पंचांग - एका नव्या पालवीची चाहूल

      आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात 'लहानाचं मोठं' होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपले 'सण' आणि 'उत्सव' फार महत्वाची भूमिका निभावत असतात. एक प्रकारे ते आपल्यावर जणू संस्कारच करत असतात. आपण निरनिराळ्या पद्धतीने हे सण साजरे करत असतो आणि त्याचबरोबर त्या सणांबरोबर येणाऱ्या सर्व प्रथासुद्धा पाळत असतो. तेव्हा आपल्या घरी, आपली आई किंवा आजी एखादी गोष्ट अशीच कर किंवा अशी करू नकोस असं आपल्याला सांगत असते. लहानपणी आपण तसे वागतो देखील, पण नंतर आयुष्याच्या एका टप्प्यावर तरी हा प्रश्न नक्कीच पडतो, की "या दिवशी हे असेच का करायचे?” काही वेळा या प्रश्नांचे उत्तर मिळते, पण बहुतांश वेळी "आमच्या पणजोबांपासून आम्ही असंच करत आलो आहोत" किंवा "असं विचारायचं आमचं धाडस झालं नाही" अशा असमाधानकारक उत्तरांनी आपल्याला पेचात टाकले जाते. मग याचा परिणाम म्हणजे त्या प्रथेवरचा, गोष्टीवरचा आपला विश्वास उडण्यास सुरुवात होते; नाहीतर आपण अगदी आंधळेपणानी ती गोष्ट पाळायला लागतो. या दोन्ही परस्पर विरोधी मतांचा विचार केल्यावर आम्हाला असा प्रश्न पडला, की असे करताना आपण त्या सणाचा किंवा त्या परंपरेचा जाणते-अजाणतेपणी अपमान तर करत नाही ना? म्हणूनच आम्ही आपल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा जवळून अभ्यास सुरु केला. आम्ही वास्तुकलेचे विद्यार्थी असल्यामुळे आमचा 'सौंदर्यशास्त्रा'बरोबर जवळून संबंध आला. त्यामुळे अर्थातच आम्हाला अभ्यासाचा मार्ग सापडला आणि सौंदर्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या भारतीय संस्कृतीचे काही पैलू गवसले. ते सर्वांसमोर मांडण्यासाठी आम्ही एक प्रभावी माध्यम शोधात होतो, त्यातूनच 'चित्र पंचांग' ह्या ब्लॉग ची निर्मिती झाली. 'नास्तिकतेचा कटूपणा' आणि 'आस्तिकतेचा भाबडेपणा' यांच्या मध्ये कुठेतरी आमचे विचार आणि लेख असतील हे जाणकार वाचकांनी समजून घ्यावे ही नम्र विनंती!
      'सण' म्हणजे भारतीय संस्कृतीमधील अविभाज्य घटक, आपल्याला अगदी हवेहवेसे वाटणारे! सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सणांच्या निमित्ताने का होईना लोक एकत्र येतात, भेटीगाठी होतात. प्रत्येक जण छोट्या-मोठ्या प्रमाणात आपापल्या परीने सण साजरे करतो. कारण आपल्या रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात सणांद्वारे आपण नवा उत्साह, नवे चैतन्य शोधत असतो. अत्यंत व्यस्त अशा आपल्या दिनचर्येत , दर महिन्याला लहानसा का होईन पण एखादा सण आपण साजरा करतो. या प्रत्येक सणामागे एक विचार दडलेला असतो असा समज आहे. पण बहुतांश वेळी, हे सण साजरे करण्यामागे भोवतालच्या निर्सगातील परिस्थितिचे प्रतिबिंब रेखाटण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. याचे कारण म्हणजे माणसाने पूर्वीपासून निसर्गाच्या सौंदर्याचा आधार घेतलेला आहे. आजूबाजूच्या निसर्गात जे काही निराळे आणि सुंदर दिसते ते माणसाला हवेहवेसे वाटते, मग ते पक्ष्यांप्रमाणे उडणे असो किंवा माशांप्रमाने पोहणे असो!
      आपल्या सुदैवानी भारतीय उपखंडाला निसर्गाच्या आणि हवामानाच्या वैविध्यतेची देणगी लाभलेली आहे. वसंतापासून सुरु होऊन शिशिराला संपणारे ऋतुचक्र आपल्याला निसर्गाच्या बदलाच्या अनेक मनमोहक छटा दाखवते. पूर्वापार निसर्गात चालणारे हे सोहळे पाहून माणसालादेखील 'तसं काही' साजरं करण्याची गरज वाटू लागली असावी. मग त्यावर आधारित आपला एक एक सण उदयास आला असावा. म्हणूनच प्रत्येक नव्या ऋतूचे आगमन आपण एका नव्या सणाच्या रुपात साजरे करतो. केवळ ‘निसर्गातील बदलांचे अनुकरण' एवढ्यावर न थांबता, त्याच्या बरोबरीने माणसाने प्रत्येक सणामागे एक वैचारिक अर्थ रुजवला आणि तो वाढवला! त्यामुळे आपली भारतीय संस्कृती ही 'सौंदर्य' आणि 'तत्वज्ञान' या दोन्हीच्या आधारावर तयार झालेल्या सणांमुळे अजूनच बहरली. कालांतराने ते सण साजरे करण्याच्या स्वरूपामध्ये काही बदल झाले असले तरी त्यामागचे कारण, ती भावना मात्र तशीच राहिली.
      नंतर मग कालानुरूप ते सण टिकून राहावेत म्हणून त्यांना 'धर्माच्या' चौकटीत बांधलं गेलं. त्यांना रुढींचं स्वरूप प्राप्त झालं. साहजिकच नवीन विचारांनी शुद्ध होणारी आपली 'वैचारिक सरिता' मंदावली. येणाऱ्या काळात तरुण पिढीमध्ये सणांसाठी असणारा पूर्वीसारखा उत्साह राहिला नाही. केवळ कर्तव्य भावनेमधून आपण हे उत्सव साजरे करू लागलो आहोत का? अशी धाकधूक वाटू लागली आहे. वास्तविक आपले सण, उत्सव या किती आनंददायी, प्रसन्न गोष्टी आहेत; पण आजकाल हा उत्साह कुठेतरी विरला आहे असे वाटते.
      या लेखमालेच्या रूपातून आम्हाला ह्या सणांचे महत्त्व, उपयुक्तता आणि त्यांच्यामागचा खरा अर्थ शोधायचा आहे. स्वतंत्र विचार करणारी तरुण पिढी म्हणून आम्हाला काय वाटते, ते यातून मांडायचे आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या रूढी, प्रथा यांच्या काटेकोर चौकटीतून बाहेर पडून त्यापलीकडील सौंदर्याने भरलेली संस्कृती आणि परंपरा समजून घेण्याचा आमचा मानस आहे. संस्कृती ही नदीप्रमाणे 'गतिमान' असते आणि समाज हा 'परिवर्तनशील' असतो त्यामुळे काळानुसार बदल होणं स्वाभाविकच आहे. परंतु, स्वरूप आणि पद्धत कितीही बदलली, तरी या सणांमागचा 'आशय' आणि 'चैतन्य' मात्र तेच राहायला हवे. सौंदर्यदृष्टी ही आपल्या पुरातन जीवनाचा अविभाज्य घटक होती त्यामुळे आपली भारतीय संस्कृती इतकी शतके चिरंतन टिकून राहिली. यापुढे आपली संस्कृती टिकवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या साऱ्यांवरच आहे. आपली संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास आपण नाही करायचा तर कोणी करायचा? म्हणूनच आमचा हा लहानसा प्रयत्न!
      येत्या चैत्र शु. प्रतिपदेपासून, अर्थातच गुढी पाडव्याच्या दिवशी, दि. २८ मार्च २०१७ रोजी, आमच्या चित्र पंचांगाचा पहिला भाग प्रदर्शित होईल. दर महिन्याला येणाऱ्या किमान एका सणाची आपल्याला नव्याने ओळख करून देण्याचा आमचा मानस आहे. आम्ही मांडलेले विचार हे संपूर्णपणे बरोबरच आहेत असा आमचा दावा नाही हे नम्रपणे सांगतो! आपण आमचे लेख जरूर वाचाल आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवल अशी आम्ही आशा बाळगतो!
सलील सावरकर - +९१-९८२३९००३१८
अनुजा जोगदेव - +९१-८९७५७६७५९९