आपल्यापैकी
प्रत्येकाच्या आयुष्यात
'लहानाचं
मोठं'
होण्याच्या
प्रक्रियेमध्ये आपले 'सण'
आणि
'उत्सव'
फार
महत्वाची भूमिका निभावत असतात.
एक
प्रकारे ते आपल्यावर जणू
संस्कारच करत असतात.
आपण
निरनिराळ्या पद्धतीने हे सण
साजरे करत असतो आणि त्याचबरोबर
त्या सणांबरोबर येणाऱ्या
सर्व प्रथासुद्धा पाळत असतो.
तेव्हा
आपल्या घरी,
आपली
आई किंवा आजी एखादी गोष्ट अशीच
कर किंवा अशी करू नकोस असं
आपल्याला सांगत असते.
लहानपणी
आपण तसे वागतो देखील,
पण
नंतर आयुष्याच्या एका टप्प्यावर
तरी हा प्रश्न नक्कीच पडतो,
की
"या
दिवशी हे असेच का करायचे?”
काही
वेळा या प्रश्नांचे उत्तर
मिळते,
पण
बहुतांश वेळी "आमच्या
पणजोबांपासून आम्ही असंच करत
आलो आहोत"
किंवा
"असं
विचारायचं आमचं धाडस झालं
नाही"
अशा
असमाधानकारक
उत्तरांनी
आपल्याला पेचात टाकले जाते.
मग
याचा परिणाम म्हणजे त्या
प्रथेवरचा,
गोष्टीवरचा
आपला विश्वास उडण्यास सुरुवात
होते;
नाहीतर
आपण अगदी आंधळेपणानी ती गोष्ट
पाळायला लागतो.
या
दोन्ही परस्पर विरोधी मतांचा
विचार केल्यावर आम्हाला असा
प्रश्न पडला,
की
असे करताना आपण त्या सणाचा
किंवा त्या परंपरेचा जाणते-अजाणतेपणी
अपमान तर करत नाही ना?
म्हणूनच
आम्ही आपल्या संस्कृतीचा आणि
परंपरांचा जवळून अभ्यास सुरु
केला.
आम्ही
वास्तुकलेचे विद्यार्थी
असल्यामुळे आमचा 'सौंदर्यशास्त्रा'बरोबर
जवळून संबंध आला.
त्यामुळे
अर्थातच आम्हाला अभ्यासाचा
मार्ग सापडला आणि सौंदर्यशास्त्राचा
उत्तम नमुना असलेल्या भारतीय
संस्कृतीचे काही पैलू गवसले.
ते
सर्वांसमोर मांडण्यासाठी
आम्ही एक प्रभावी माध्यम शोधात
होतो,
त्यातूनच
'चित्र
पंचांग'
ह्या
ब्लॉग ची निर्मिती झाली.
'नास्तिकतेचा
कटूपणा'
आणि
'आस्तिकतेचा
भाबडेपणा'
यांच्या
मध्ये कुठेतरी आमचे विचार
आणि लेख असतील हे जाणकार
वाचकांनी समजून घ्यावे ही
नम्र विनंती!
'सण'
म्हणजे
भारतीय संस्कृतीमधील अविभाज्य
घटक,
आपल्याला
अगदी हवेहवेसे वाटणारे!
सध्याच्या
वेगवान जीवनशैलीत सणांच्या
निमित्ताने का होईना लोक एकत्र
येतात,
भेटीगाठी
होतात.
प्रत्येक
जण छोट्या-मोठ्या
प्रमाणात आपापल्या परीने सण
साजरे करतो.
कारण
आपल्या रोजच्या कंटाळवाण्या
आयुष्यात सणांद्वारे आपण नवा
उत्साह,
नवे
चैतन्य शोधत असतो.
अत्यंत
व्यस्त अशा आपल्या दिनचर्येत
,
दर
महिन्याला लहानसा का होईन पण
एखादा सण आपण साजरा करतो.
या
प्रत्येक सणामागे एक विचार
दडलेला असतो असा समज आहे.
पण
बहुतांश वेळी,
हे
सण साजरे करण्यामागे भोवतालच्या
निर्सगातील परिस्थितिचे
प्रतिबिंब रेखाटण्याचा प्रयत्न
केलेला दिसतो.
याचे
कारण म्हणजे माणसाने पूर्वीपासून
निसर्गाच्या सौंदर्याचा आधार
घेतलेला आहे.
आजूबाजूच्या
निसर्गात जे काही निराळे आणि
सुंदर दिसते ते माणसाला हवेहवेसे
वाटते,
मग
ते पक्ष्यांप्रमाणे उडणे असो
किंवा माशांप्रमाने पोहणे
असो!
आपल्या
सुदैवानी भारतीय उपखंडाला
निसर्गाच्या आणि हवामानाच्या
वैविध्यतेची देणगी लाभलेली
आहे.
वसंतापासून
सुरु होऊन शिशिराला संपणारे
ऋतुचक्र आपल्याला निसर्गाच्या
बदलाच्या अनेक मनमोहक छटा
दाखवते.
पूर्वापार
निसर्गात चालणारे हे सोहळे
पाहून माणसालादेखील 'तसं
काही'
साजरं
करण्याची गरज वाटू लागली
असावी.
मग
त्यावर आधारित आपला एक एक सण
उदयास आला असावा.
म्हणूनच
प्रत्येक नव्या ऋतूचे आगमन
आपण एका नव्या सणाच्या रुपात
साजरे करतो.
केवळ
‘निसर्गातील बदलांचे अनुकरण'
एवढ्यावर
न थांबता,
त्याच्या
बरोबरीने माणसाने प्रत्येक
सणामागे एक वैचारिक अर्थ
रुजवला आणि तो वाढवला!
त्यामुळे
आपली भारतीय संस्कृती ही
'सौंदर्य'
आणि
'तत्वज्ञान'
या
दोन्हीच्या आधारावर तयार
झालेल्या सणांमुळे अजूनच
बहरली.
कालांतराने
ते सण साजरे करण्याच्या
स्वरूपामध्ये काही बदल झाले
असले तरी त्यामागचे कारण,
ती
भावना मात्र तशीच राहिली.
नंतर
मग कालानुरूप ते सण टिकून
राहावेत म्हणून त्यांना
'धर्माच्या'
चौकटीत
बांधलं गेलं.
त्यांना
रुढींचं स्वरूप प्राप्त झालं.
साहजिकच
नवीन विचारांनी शुद्ध होणारी
आपली 'वैचारिक
सरिता'
मंदावली.
येणाऱ्या
काळात तरुण पिढीमध्ये सणांसाठी
असणारा पूर्वीसारखा उत्साह
राहिला नाही.
केवळ
कर्तव्य भावनेमधून आपण हे
उत्सव साजरे करू लागलो आहोत
का?
अशी
धाकधूक वाटू लागली आहे.
वास्तविक
आपले सण,
उत्सव
या किती आनंददायी,
प्रसन्न
गोष्टी आहेत;
पण
आजकाल हा उत्साह कुठेतरी विरला
आहे असे वाटते.
या
लेखमालेच्या रूपातून आम्हाला
ह्या सणांचे महत्त्व,
उपयुक्तता
आणि त्यांच्यामागचा खरा अर्थ
शोधायचा आहे.
स्वतंत्र
विचार करणारी तरुण पिढी म्हणून
आम्हाला काय वाटते,
ते
यातून मांडायचे आहे.
वर्षानुवर्षे
चालणाऱ्या रूढी,
प्रथा
यांच्या काटेकोर चौकटीतून
बाहेर पडून त्यापलीकडील
सौंदर्याने भरलेली संस्कृती
आणि परंपरा समजून घेण्याचा
आमचा मानस आहे.
संस्कृती
ही नदीप्रमाणे 'गतिमान'
असते
आणि समाज हा 'परिवर्तनशील'
असतो
त्यामुळे काळानुसार बदल होणं
स्वाभाविकच आहे.
परंतु,
स्वरूप
आणि पद्धत कितीही बदलली,
तरी
या सणांमागचा 'आशय'
आणि
'चैतन्य'
मात्र
तेच राहायला हवे.
सौंदर्यदृष्टी
ही आपल्या पुरातन जीवनाचा
अविभाज्य घटक होती त्यामुळे
आपली भारतीय संस्कृती इतकी
शतके चिरंतन टिकून राहिली.
यापुढे
आपली संस्कृती टिकवण्याची
आणि पुढे नेण्याची जबाबदारी
आपल्या साऱ्यांवरच आहे.
आपली
संस्कृती आणि परंपरा यांचा
अभ्यास आपण नाही करायचा तर
कोणी करायचा?
म्हणूनच
आमचा हा लहानसा प्रयत्न!
येत्या
चैत्र शु.
प्रतिपदेपासून,
अर्थातच
गुढी पाडव्याच्या दिवशी,
दि.
२८
मार्च २०१७ रोजी,
आमच्या
चित्र पंचांगाचा पहिला भाग
प्रदर्शित होईल.
दर
महिन्याला येणाऱ्या किमान
एका सणाची आपल्याला नव्याने
ओळख करून देण्याचा आमचा मानस
आहे.
आम्ही
मांडलेले विचार हे संपूर्णपणे
बरोबरच आहेत असा आमचा दावा
नाही हे नम्रपणे सांगतो!
आपण
आमचे लेख जरूर वाचाल आणि तुमच्या
प्रतिक्रिया आमच्यापर्यंत
पोचवल अशी आम्ही आशा बाळगतो!
सलील
सावरकर -
+९१-९८२३९००३१८
अनुजा
जोगदेव -
+९१- ८९७५७६७५९९
Khup sunder kalpana ani prayatna ahet....khup khup shubhechchha....
ReplyDeleteThank you very much for your encouragement😊
Deleteही कल्पना खूपच छान आहे. पुढील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आधुनिक माध्यम निवडले हे फार उत्तम!
ReplyDeleteप्रज्ञा सुखटणकर
Thank you very much Mavashi!😇
Deleteही कल्पना खूपच छान आहे. पुढील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आधुनिक माध्यम निवडले हे फार उत्तम!
ReplyDeleteप्रज्ञा सुखटणकर
Nice idea. An opportunity to understand our tradition n culture, debate bout it and clear the myths if any. We do many rituals without understanding the reason. Such a blog would be a step forward towards knowing the real meaning n message in our festivals and associated practicea.
ReplyDeleteThank you very much for such nice words!😊 Means a lot to us!
Delete